Pune Corona Update : दिवसभरात 830 पॉझिटिव्ह रुग्ण; 551 रुग्णांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज : आज (शुक्रवार, दि. 5 मार्च) दिवसभरात 830 नवे रुग्ण सापडले आहेत. तर 551 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. दिवसेंदिवस कोरोनाची रुग्णसंख्या वेगाने वाढताना पहायला मिळत आहे.

आज पुणे परिसरातील 5 रुग्णांचा तर पुण्याबाहेरील 4 रुग्णांचा मृत्यू झाला असून 300 रुग्णांवर उपचार सुरु आहेत आणि 664 रुग्ण ऑक्सिजन बेडवर उपचार घेत आहेत.

आजपर्यंत एकूण पॉझिटिव्ह रुग्णसंख्या 2 लाख 6 हजार 383 इतकी झाली आहे. तर ॲक्टिव्ह रुग्ण संख्या 6160 वर पोहोचली आहे. तसेच आजपर्यंत एकूण 4881 रुग्णांचा मृत्यू झाला.

तरीही नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी. तोंडाला मास्क, हात धुणे आणि शारीरिक आंतरपालन करण्याचे आवाहन पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.