Pune Corona Update: रविवारी 852 रुग्णांची भर; 420 जणांना डिस्चार्ज तर 12 रुग्णांचा मृत्यू

Pune Corona Update: 852 patients added on Sunday; 420 people discharged and 12 patients died आतापर्यंत 715 जणांचा मृत्यू झाला आहे. 7 हजार 696 सक्रिय रुग्ण असून रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

एमपीसी न्यूज- पुणे शहरात रविवारी 852 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 420 जण ठणठणीत बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. दरम्यान, आज 12 जणांचा मृत्यू झाला. पुणे शहरात आता कोरोनाचे 21 हजार 520 रुग्ण झाले आहेत. 13 हजार 109 जणांनी कोरोनावर मात केली आहे.

आतापर्यंत 715 जणांचा मृत्यू झाला आहे. 7 हजार 696 सक्रिय रुग्ण असून रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. 410 जण गंभीर रुग्ण असून त्यात 70 जण व्हेंटिलेटरवर आहेत, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे देण्यात आली आहे.

बोपोडीतील 76 वर्षीय पुरुषाचा डीएच औंध हॉस्पिटलमध्ये, हडपसरमधील 80 वर्षीय पुरुषाचा ससून हॉस्पिटलमध्ये, हडपसरमधील 65 वर्षीय पुरुषाचा ससून हॉस्पिटलमध्ये, कसबा पेठेतील 88 वर्षीय पुरुषाचा केईएम हॉस्पिटलमध्ये, हडपसरमधील 82 वर्षीय महिलेचा नोबेल हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला.

कोंढाव्यातील 55 वर्षीय महिलेचा, भवानी पेठेतील 72 वर्षीय पुरुषाचा ससून हॉस्पिटलमध्ये, विश्रांतवाडीतील 84 वर्षीय पुरुषाचा सह्याद्री हॉस्पिटलमध्ये, गोखलेनगरमधील 64 वर्षीय पुरुषाचा ससून हॉस्पिटलमध्ये, बोपोडीतील 60 वर्षीय पुरुषाचा डीएच औंध हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला.

कसबा पेठेतील 75 वर्षीय महिलेचा नायडू हॉस्पिटलमध्ये, अप्पर इंदिरानगरमधील 70 वर्षीय पुरुषाचा नायडू हॉस्पिटलमध्ये कोरोनामुळे मृत्यू झाला. कोरोनाच्या मोठ्या प्रमाणात चाचण्या करण्यात येत असल्याने रुग्ण वाढत असल्याचे आरोग्य विभागातर्फे सांगण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.