Pune Corona Update: नवे 861 रुग्ण, 630 जणांना डिस्चार्ज, 15 जणांचा मृत्यू

Pune Corona Update: 861 new patients, 630 discharged, 15 dead एकूण 22 हजार 381 पैकी 13 हजार 739 जणांची कोरोनावर मात, आतापर्यंत 730 कोरोनाबाधितांचा मृत्यू

एमपीसी न्यूज – कोरोनाचे आज (सोमवारी) दिवसभरात 861 नवे रुग्ण आढळले. 630 जण ठणठणीत बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. तर, 15 जणांचा मृत्यू झाला.

कोरोनाचे पुणे शहरात 22 हजार 381 रुग्ण झाले आहेत. आतापर्यंत 13 हजार 739 जणांनी कोरोनावर मात केली आहे.  7 हजार 912 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यापैकी 368 क्रिटिकल रुग्ण असून त्यात 64 जण व्हेंटिलेटरवर आहेत. या विषाणूमुळे 730 नागरिकांचा आजपर्यंत मृत्यू झाला आहे, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे देण्यात आली आहे.

सदाशिव पेठेतील 67 वर्षीय पुरुषाचा दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये, मंगळवार पेठेतील 52 वर्षीय पुरुषाचा रुबी हॉल क्लिनिकमध्ये, हडपसरमधील 63 वर्षीय पुरुषाचा नोबेल हॉस्पिटलमध्ये, संगमवाडीतील 79 वर्षीय पुरुषाचा ससून हॉस्पिटलमध्ये, येरवड्यातील 62 वर्षीय पुरुषाचा ससून हॉस्पिटलमध्ये, फुरसुंगीतील 52 वर्षीय पुरुषाचा बुधराणी हॉस्पिटलमध्ये, बिबवेवाडीतील 59 वर्षीय पुरुषाचा नायडु हॉस्पिटलमध्ये, संगमवाडीतील 83 वर्षीय महिलेचा केईएम हॉस्पिटलमध्ये, हडपसरमधील 72 वर्षीय पुरुषाचा ससून हॉस्पिटलमध्ये, बिबवेवाडीतील 61 वर्षीय पुरुषाचा कोंढाव्यातील रुग्णालयात, गिरमा बाग परिसरातील 83 वार्षिक पुरुषाचा रुबी हॉल क्लिनिकमध्ये, साई सुलोचना अपार्टमेंटमधील 79 वर्षीय पुरुषाचा सह्याद्री हॉस्पिटलमध्ये, हडपसरमधील 50 वर्षीय पुरुषाचा ससून हॉस्पिटलमध्ये, कोंढाव्यातील 37 वर्षीय पुरुषाचा ससून हॉस्पिटलमध्ये, सेनापती बापट रस्त्यावर असलेल्या सोसायटीतील 62 वर्षीय पुरुषाचा सह्याद्री हॉस्पिटलमध्ये कोरोनामुळे मृत्यू झाला. कोरोनाच्या आज 4 हजार 548 चाचण्या करण्यात आल्या.

नागरिक मोठ्या प्रमाणात बाहेर येत असल्याने कोरोना संकट संसर्गात वाढ : गिरीश बापट

सध्या अनलॉक-२ मध्ये संचारबंदीत शितीलता आल्यामुळे नागरिक उद्योग धंद्याकरिता मोठ्या प्रमाणात बाहेर पडत आहेत. त्यामुळे दिवसेंदिवस कोरोना संसर्गात वाढ होत आहे, ही बाब अत्यंत गंभीर असून यावर वेळीच उपाययोजना करणे आहे, अशी सूचना खासदार गिरीश बापट यांनी केली. सोमवारी पुणे शहर आणि  जिल्ह्यातील खासदार व आमदार यांच्या समवेत विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी गुगल मिटवर बैठक घेतली. या बैठकीमध्ये शहरातील कोरोना संदर्भात असणारे प्रश्न व त्यावर करावयाच्या उपाययोजना याविषयी चर्चा झाली. राज्यसभेच्या खासदार अ‍ॅड. वंदना चव्हाण, खासदार सुप्रिया सुळे, आमदार नीलम गोऱ्हे यांनीही कोरोना संदर्भात अनेक सूचना केल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.