Pune Corona Update: गुरुवारी सर्वाधिक 937 नवे रुग्ण, 631 जणांना डिस्चार्ज, 14 जणांचा मृत्यू

कोरोनाबाधितांची संख्या 19 हजार 42 वर, कोरोनामुक्तांची संख्या 11 हजार 671 तर सक्रिय रुग्ण 6 हजार 695

एमपीसी न्यूज – कोरोनाचे गुरुवारी सर्वाधिक 937 रुग्ण आढळले. एका दिवसात रुग्णवाढीचा हा आजपर्यंतचा सर्वाधिक उच्चांक आहे. पुण्यात आता कोरोनाबाधितांची एकूण संख्या 19 हजार 42 झाली आहे.  गुरुवारी 631 रुग्ण ठणठणीत बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. तर,   14 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला.

आतापर्यंत 11 हजार 671 जणांनी कोरोनावर मात केली आहे. शहरातील कोरोनामुक्तांची टक्केवारी 61.29 टक्के आहे. एकूण 676 कोरोनाबाधितांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. शहरातील मृत्यूदर 3.55 टक्क्यांपर्यंत खाली आहे. शहरात सक्रिय रुग्णसंख्या 6 हजार 695 आहे. सक्रिय रुग्णांचे प्रमाण 35.16 टक्के आहे. सक्रिय रुग्णांपैकी 344 क्रिटिकल रुग्ण असून, त्यात 56 जण व्हेंटिलेटरवर आहेत.

आज कोरोनाच्या तब्बल 4 हजार 140 चाचण्या करण्यात आल्या. आतापर्यंत एकूण 1 लाख 24 हजार 198 व्यक्तींचे स्वॅब नमुने संकलित करण्यात आले आहेत. मागील काही दिवसांपासून चाचण्या वाढविण्यात आल्या असल्याने रुग्णसंख्या वाढत असल्याचे पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे सांगण्यात आले.

पाषाणमधील 66 वर्षीय महिलेचा जहांगीर हॉस्पिटलमध्ये, हडपसरमधील 84 वर्षीय पुरुषाचा AICTS हॉस्पिटलमध्ये, पांडवनगरमधील 51 वर्षीय महिलेचा दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये, शुक्रवार पेठेतील 54 वर्षीय पुरुषाचा दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये, सिंहगड रस्त्यावरील 56 वर्षीय महिलेचा दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये, वैदूवाडीतील 65 वर्षीय पुरुषाचा सासून हॉस्पिटलमध्ये, वानवडीतील 65 वर्षीय पुरुषाचा सह्याद्री हॉस्पिटलमध्ये, हडपसरमधील 65 वर्षीय पुरुषाचा रुबी हॉल क्लिनिकमध्ये, केशवनगरमधील 55 वर्षीय पुरुषाचा ससून हॉस्पिटलमध्ये, येरवड्यातील 80 वर्षीय महिलेचा इनामदार हॉस्पिटलमध्ये, कोंढवा बुद्रुकमधील 59 वर्षीय महिलेचा भारती हॉस्पिटलमध्ये, जणवाडीतील 83 वर्षीय पुरुषाचा सह्याद्री हॉस्पिटलमध्ये, ससाणे नगरमधील 59 वर्षीय पुरुषाचा सह्याद्री हॉस्पिटलमध्ये, बावधनमधील 85 वर्षीय पुरुषाचा सह्याद्री हॉस्पिटलमध्ये कोरोनामुळे मृत्यू झाला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.