Pune Corona Update : दिवसभरात 973 नवे कोरोना रुग्ण तर 2 हजार 496 रुग्णांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – पुण्यात कोरोनाचा रुग्णांची संख्या कमी होताना दिसत आहे. आजही नव्या रुग्णांपेक्षा डिस्चार्ज मिळालेल्या नागरिकांची संख्या अधिक आहे. आज, दिवसभरात शहरात नव्याने 973 कोरोनाबाधित रुग्णांची तर 2 हजार 496 रुग्णांना डिस्चार्ज देिल्याची नोंद करण्यात आली आहे. 

पुणे महापालिका हद्दीत नव्याने 41 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.आजच्या नव्या संख्येसह मृतांची एकूण संख्या 7 हजार 928 इतकी झाली आहे. शहरात उपचार घेणाऱ्या 13 हजार 479 रुग्णांपैकी 1315 रुग्ण गंभीर तर 4279 रुग्ण ऑक्सिजनद्वारे उपचार घेत आहेत

आजपर्यंत एकूण पॉझिटिव्ह रुग्णसंख्या 4 लाख 64 हजार 076  इतकी झाली आहे.  पुण्यात आतापर्यंत एकूण 4 लाख 42 हजार 669 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, तर आज दिवसभरात 11,676 इतक्या जणांचे स्वॅब टेस्टसाठीचे नमुने घेण्यात आले.

तरीही नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी. तोंडाला मास्क, हात धुणे आणि शारीरिक आंतरपालन करण्याचे आवाहन पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.