Pune Corona Update : पुण्यात 98 नवे रुग्ण ; 123 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज : पुणे शहर आणि उपनगरात आज दिवसभरात 98 नवे रुग्ण आढळले. तर 123 कोरोनामुक्त नागरीकांना घरी सोडण्यात आले.

महापालिकेच्या आकडेवारीनुसार आज 205 जणांची प्रकृती चिंताजनक असून 295 जण ऑक्सिजन बेडवर उपचार घेत आहेत. आज दिवसभरात केवळ 1 रुग्णाचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या 2 हजार 25 इतकी झाली आहे. आजपर्यंत 1 लाख 78 हजार 16 कोरोनामुक्त नागरिकांना घरी सोडण्यात आले आहे.

महापालिका प्रशासनाकडून पुणेकरांना विनंती केली जात आहे की निर्धास्त न राहता घराबाहेर पडताना विविध ठिकाणी वावरताना तोंडाला मास्क लावा. हँड सॅनिटायजर आणि सोशल डिस्टंन्सिग नियमांचे पालन करण्याचेही निर्देश दिले आहेत. तसेच सौम्य ते तीव्र लक्षणे आढळल्यास तातडीने अँटीजेन, स्वॅब टेस्टींग करून खबरदारी घ्यावी. तसेच पॉजिटिव्ह आढळल्यास घरातच विलगीकरण करावे. नजिकच्या रुग्णालयात औषधोपचार सुरु करण्याचे आवाहन केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.