Pune Corona Update: मागील 24 तासात 998 कोरोनामुक्त रुग्णांना डिस्चार्ज तर 486 नवे रुग्ण

एमपीसी न्यूज – मागील काही दिवसांपासून पुण्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत घट  होत असल्याचे चित्र दिसत आहे तर दुसरीकडे कोरोना मुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या देखील वाढत आहे. मागील 24 तासात पुणे शहरातील तब्बल 998 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे. तर 486 नवीन कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत.

दिवसभरात 30 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून त्यातील 3 रुग्ण पुण्याबाहेरील आहेत. एकट्या पुणे शहरात आतापर्यंत 3871 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

पुणे शहरात आतापर्यंत कोरोनाबधितांची रुग्णसंख्या 1 लाख 55 हजार 67 वर जाऊन पोहोचली. त्यातील 1 लाख 39 हजार 450 रुग्ण उपचाराअंती बरे झाले आहेत. त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

सद्यस्थितीत पुणे शहरात 11746 सक्रिय रुग्ण आहेत. यातील 833 रुग्ण क्रिटिकल अवस्थेत आहेत. यातील 450 रुग्णांवर व्हेंटिलेटरवर उपचार सुरू आहेत.

संपूर्ण शहरात सध्या covid-19 चे रुग्ण सापडत असल्यामुळे नागरिकांनी प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचं पालन करावं. या ठिकाणी जाणे शक्यतो टाळावे. अशावेळी चेहऱ्यावर मास्क असणे बंधनकारक करण्यात आले आहे. तर सामाजिक अंतर ठेवून वेळोवेळी सॅनिटायझरचा वापर करण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.