Pune Corona Update : दिवसभरात 162 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ !

एमपीसी न्यूज : पुण्यात आज दिवसभरात 162 नवे रुग्ण सापडले. तर 145 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.

दुर्दैवाने आज करोनाबाधीत 4 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यापैकी सर्व रुग्ण पुण्याबाहेरील होते. एकूण 113 गंभीर रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 206 जण ऑक्सिजन बेडवर उपचार सुरू आहेत. आजपर्यंत एकूण पॉझिटिव्ह रुग्णसंख्या 1 लाख 87 हजार 165 इतकी झाली आहे. तर ॲक्टिव्ह रुग्ण संख्या 1396 वर पोहोचली आहे. आजपर्यंत एकूण 4779 रुग्णांचा मृत्यू झाला. तसेच आजपर्यंतच एकूण 1 लाख 87 हजार 165 कोरोनामुक्त नागरिकांना घरी सोडले आहे.

तरीही नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी. तोंडाला मास्क, हात धुणे आणि शारिरीक आंतरपालन करण्याचे आवाहन पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.