Pune Corona Update : दिवसभरात 196 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ !

एमपीसी न्यूज : पुण्यात आज दिवसभरात 196 नवे रुग्ण सापडले. तर 170 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.

आज करोनाबाधित 5 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यापैकी 1 रूग्ण पुण्याबाहेरील होते. एकूण 131 गंभीर रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 212 जण ऑक्सिजन बेडवर उपचार सुरू आहेत. आजपर्यंत एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 1 लाख 93 हजार 795 इतकी झाली आहे. तर ॲक्टिव्ह रुग्ण संख्या 1475 वर पोहोचली आहे. आजपर्यंत एकूण 4788 रुग्णांचा मृत्यू झाला.

तरीही नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी. तोंडाला मास्क, हात धुणे आणि शारिरीक आंतरपालन करण्याचे आवाहन पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.