Pune Corona Update : दिवसभरात 216 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ !

एमपीसी न्यूज : पुण्यात आज दिवसभरात 216 नवे कोरोनाबाधीत रुग्ण सापडले. तर 197 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.

आज कोरोनाबाधीत 5 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यापैकी 1 रूग्ण पुण्याबाहेरील होते. एकूण 120 गंभीर रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर जण ऑक्सिजन बेडवर उपचार सुरू आहेत.

आजपर्यंत एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 1 लाख 93 हजार 556 इतकी झाली आहे. तर ॲक्टिव्ह रुग्ण संख्या 1411 वर पोहोचली आहे. आजपर्यंत एकूण 4783 रुग्णांचा मृत्यू झाला.

तरीही नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी. तोंडाला मास्क, हात धुणे आणि शारिरीक आंतरपालन करण्याचे आवाहन पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.