Pune Corona Update : दिवसभरात 2902 रुग्णांची वाढ तर 2986 रुग्णांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – पुण्यात आज दिवसभरात 2902 कोरोना रुग्णांची वाढ झाली असून 2986 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

महापालिका हद्दीत नव्याने 66 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे तर 20 रुग्ण पुण्याबाहेरील आहेत. आजच्या नव्या संख्येसह मृतांची एकूण संख्या 7 हजार 184 इतकी झाली आहे. पुणे शहरात उपचार घेणारे 1414 रुग्ण गंभीर तर 6571 रुग्ण ऑक्सिजनद्वारे उपचार घेत आहेत. आजपर्यंत एकूण पॉझिटिव्ह रुग्णसंख्या 4 लाख 39 हजार 251 इतकी झाली आहे.

पुण्यात आतापर्यंत एकूण 3 लाख 92 हजार 485 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, तर आज दिवसभरात 18862 इतक्या जणांचे स्वॅब टेस्टसाठीचे नमुने घेण्यात आले तर एकूण टेस्ट संख्या आता 22 लाख 29 हजार 100 इतकी झाली आहे.

तरीही नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी. तोंडाला मास्क, हात धुणे आणि शारीरिक आंतरपालन करण्याचे आवाहन पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.