Pune Corona Update : दिवसभरात 354 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ !

एमपीसी न्यूज : पुण्यात आज दिवसभरात 354 नवे रुग्ण सापडले. तर 248 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.

आज एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला. एकूण 145 गंभीर रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 248 जण ऑक्सिजन बेडवर उपचार सुरू आहेत. आजपर्यंत एकूण पॉझिटिव्ह रुग्णसंख्या 1 लाख 94 हजार 994 इतकी झाली आहे. तर ॲक्टिव्ह रुग्ण संख्या 1661 वर पोहोचली आहे. आजपर्यंत एकूण 4799 रुग्णांचा मृत्यू झाला.

तरीही नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी. तोंडाला मास्क, हात धुणे आणि शारिरीक आंतरपालन करण्याचे आवाहन पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.