Pune Corona Update : पुणे शहरात दिवसभरात 414 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ

एमपीसी न्यूज : पुण्यात आज दिवसभरात 414 नवे रुग्ण सापडले. तर 247 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. रुग्णसंख्येत वाढ होत असल्यामुळे चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. गेल्या तीन महिन्यातील एका दिवसात 400 टप्पा पार करण्याची ही पहिलीच वेळ आहे.

आज कोरोनाबाधीत 5 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण 160 गंभीर रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 345 जण ऑक्सिजन बेडवर उपचार सुरू आहेत. आजपर्यंत एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 1 लाख 97 हजार 330 इतकी झाली आहे. तर ॲक्टिव्ह रुग्ण संख्या 2561 वर पोहोचली आहे. आजपर्यंत एकूण 4821 रुग्णांचा मृत्यू झाला.

महापालिकेच्या आकडेवारी नुसार कोरोना बाधितांची संख्या संथगतीने वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी. तोंडाला मास्क, हात धुणे आणि शारिरीक आंतरपालन करावे.

तीव्र किंवा सौम्य लक्षणे आढळल्यास तात्काळ वैद्यकीय उपचार घ्यावे असे कळकळीचे आवाहन पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.