Pune Corona Update : दिवसभरात 6443 पाझिटिव्ह रुग्णांची वाढ; 4712 रुग्णांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज : पुण्यात आज दिवसभरात 6443 नवे रुग्ण सापडले आहेत. तर 4712 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. दिवसेंदिवस कोरोनाची रुग्णसंख्या वेगाने वाढताना पहायला मिळत आहे.

आज पुणे परिसरातील 73 रुग्णांचा तर पुण्याबाहेरील 20 रुग्णांचा मृत्यू झाला असून 1250 अतिगंभिर रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

आजपर्यंत एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 3 लाख 67 हजार 237 इतकी झाली आहे. तर ॲक्टिव्ह रुग्ण संख्या 56636 वर पोहोचली आहे. तसेच आजपर्यंत एकूण 6109 रुग्णांचा मृत्यू झाला.

आतापर्यंत एकूण 304492 एवढ्या जणांना डिस्चार्ज दिला आहे. तसेच आज दिवसभरात 24072 इतक्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी झाली आहे.

तरीही नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी. तोंडाला मास्क, हात धुणे आणि शारीरिक आंतरपालन करण्याचे आवाहन पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.