Pune Corona Update: बी. टी. कवडे रस्ता नव्याने सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर – आयुक्त

Pune Corona Update: B. T. Kavade Road newly declared as Micro Containment Zone - Commissioner जाणून घ्या... नव्याने जाहीर कन्टेन्मेंट झोनमध्ये कोणकोणता भाग येतो?

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बी. टी. कवडे रस्ता नव्याने सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र (मायक्रो कन्टेन्मेंट झोन) म्हणून जाहीर करीत असल्याचे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी आदेशात म्हटले आहे. 

ढोले पाटील क्षेत्रीय कार्यलयाच्या अंतर्गत येणाऱ्या बी. टी. कवडे रस्ता परिसरातील भारत फोर्ज, कल्याणी स्टील कंपनी, शिर्के कंपनी, शिंदे वस्ती, पुणे छावणी क्षेत्राची घोरपडीकडील हद्द व मिरज रेल्वेलाईन, सोलापूर रेल्वे ट्रॅक, श्रीनाथ नगर, शक्ती नगर, पंचशील नगर, घोरपडी गाव, फैलावली चाळ, भीमनगर हा परिसर सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आले आहे.

या प्रतिबंधित क्षेत्रात दूध विक्री, औषध दुकाने, दवाखाने वगळता सर्व व्यवसाय दि. 26 ते 30 जून 2020 पर्यंत बंद राहणार आहेत. दुध विक्री सकाळी 7 ते 9 पर्यंत सुरू राहील. तर, औषध दुकाने आणि दवाखाने सकाळी 9 ते सायंकाळी 7 पर्यंत सुरू राहणार आहेत.

बी. टी. कवडे रस्ता हा केवळ माल वाहतुकीसाठी आणि अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्या कामांसाठी सुरू राहील. नवीन प्रतिबंधित क्षेत्रामधील आवश्यक त्या ठिकाणी येण्याचे आणि जाण्याचे मार्ग हे संबधित भागाचे पोलीस अधिकारी त्या भागातील क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या सहकार्याने लोखंडी कठडे उभे करतील, असेही आयुक्तांनी आदेशात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.