Pune Corona Update : दिलासादायक ! पुण्यात कोरोनामुक्तांची संख्या दुपटीने वाढली

आज 2837 नवे रुग्ण ; 4673 कोरोनमुक्तांना डिस्चार्ज

18 एप्रिलपासून सक्रिय रुग्णसंख्या 20 हजार 050  ने घटली !

एमपीसीन्यूज : पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. पुणे शहरात कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या दुपटीने वाढली आहे. आज नव्याने 2 हजार 837 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. तर तब्बल 4673  कोरोनमुक्तांना डिस्चार्ज देण्यात आला . दरम्यान, 18  एप्रिलपासून सक्रिय रुग्णसंख्या 20  हजार 050 ने घटली !

_MPC_DIR_MPU_II

शहरातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या आता 4 लाख 44 हजार 539  इतकी झाली आहे. पुणे शहरात आज एकाच दिवसात 17  हजार 115  नमुने घेण्यात आले आहेत. त्यात आज नव्याने 2 हजार 837 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. शहराची एकूण टेस्ट संख्या आता 22 लाख 62 हजार 981  इतकी झाली आहे.

शहरातील 4 हजार 673 कोरोनाबाधितांना आज डिस्चार्ज देण्यात आला असून पुणे शहरातील एकूण डिस्चार्ज संख्या 4 लाख 649  झाली आहे.

पुणे महापालिका हद्दीत नव्याने 59  कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.आजच्या नव्या संख्येसह मृतांची एकूण संख्या 7  हजार 304  इतकी झाली आहे. शहरात उपचार घेणाऱ्या 36 हजार 586 रुग्णांपैकी 1,403  रुग्ण गंभीर तर 6,403  रुग्ण ऑक्सिजनद्वारे उपचार घेत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.