Pune Corona Update: महापालिकेतील महिला पदाधिकारी व तिच्या पतीलाही कोरोना संसर्ग

Pune Corona Update: Corona infection in a woman office bearer and her husband

एमपीसी न्यूज – पुणे महापालिकेच्या एका महत्त्वाच्या महिला पदाधिकारी आणि त्यांच्या पतीलाही कोरोनाची लागण झाली आहे. सध्या दोघांचीही तब्बेत स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.

सार्वजनिक ठिकाणी जाऊ नये, गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये, असे वारंवार आवाहन प्रशासनातर्फे करण्यात येते. मात्र, नगरसेवक आपापल्या प्रभागांत नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी तात्पर असतात. मागील 4 महिन्यां पासून पुणे शहरात कोरोनाचे संकट गंभीर झाले आहे.

त्या पार्श्वभूमीवर गोरगरीब नागरिकांना मदत करणे, अन्नधान्य वाटप करणे असे कार्यक्रम सातत्याने सुरू आहेत. यापूर्वीही महापालिकेतील एका महत्वाच्या पदाधिकाऱ्याचा नातेवाईकाला कोरोना झाला होता. येरवड्यातील एका नागरसेविकेला कोरोना झाला होता. आताही एका महत्त्वाच्या महिला पदाधिकाऱ्याला कोरोना झाला आहे.

बऱ्याचदा हे नगरसेवक नागरिकांना मदत करताना त्यांच्यामध्ये मिसळून जात असल्याचे चित्र सर्रासपणे दिसून येत आहे. गोरगरीब नागरिकांना जेवण, अन्नधान्य वाटप करताना हे नगरसेवक आपल्या कार्यकर्त्यांसह गर्दी करत आहेत. त्यांच्यासाठी ही बातमी सावध करणारी आहे.

नगरसेवकांना वारंवार कोरोनाची लागण होत असल्याने आता आपल्या आरोग्याची काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे. सोबतच कुटुंबांकडेही लक्ष देणे आवश्यक आहे. आपल्या प्रभागांतील नागरिकांशी नियमितपणे संवाद राहावा, त्यांच्या समस्या सातत्याने सोडविण्यात यावे, यासाठी 24 बाय 7 नगरसेवक उपलब्ध असतात.

त्यामुळे आता नगरसेवकांनी सोशल डिस्टन्स पळून, हाताला सॅनिटायजर, तोंडाला मास्क लावणे, लोकांत न  मिसळणे गरजेचे झाले आहे.

पुणे शहरात कोरोनाने सध्या धुमाकूळ घातला आहे. शहरात 10 हजारांच्या वर कोरोनाचे रुग्ण गेले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.