Pune Corona Update : दिलासादायक! नव्या रुग्णांच्या चौपट रुग्णांची कोरोनावर मात!

एमपीसी न्यूज – पुण्यात कोरोनाचा संसर्ग कमी होताना दिसत आहे. आजही नव्या रुग्णांपेक्षा डिस्चार्ज मिळालेल्या नागरिकांची संख्या चार पटींनी अधिक आहे. आज, दिवसभरात शहरात नव्याने 684 कोरोनाबाधित रुग्णांची तर 2 हजार 790 रुग्णांना डिस्चार्ज देिल्याची नोंद करण्यात आली आहे. 

पुणे महापालिका हद्दीत नव्याने 43 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर पुण्याबाहेरील 23 रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे. आजच्या नव्या संख्येसह मृतांची एकूण संख्या 7 हजार 749 इतकी झाली आहे. शहरात 1402 गंभीर रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

आजपर्यंत एकूण पॉझिटिव्ह रुग्णसंख्या 4 लाख 59 हजार 987  इतकी झाली आहे.  पुण्यात आतापर्यंत एकूण 4 लाख 33 हजार 798  जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, तर आज दिवसभरात 7862 इतके आतापर्यंत एकूण 23 लाख 72 हजार 034 जणांचे स्वॅब टेस्टसाठीचे नमुने घेण्यात आले.

तरीही नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी. तोंडाला मास्क, हात धुणे आणि शारीरिक आंतरपालन करण्याचे आवाहन पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.