_MPC_DIR_MPU_III -NEW PUN  21 JUN 2021

Pune Corona Update : दिवसभरात 3033 रुग्णांना डिस्चार्ज;1693 नवे रुग्ण,48 मृत्यू

एमपीसी न्यूज – पुण्यात आजही नव्या रुग्णांपेक्षा डिस्चार्ज मिळालेल्या नागरिकांची संख्या अधिक आहे. आज, शनिवारी दिवसभरात शहरात नव्याने 1 हजार 693 कोरोनाबाधित रुग्णांची तर 3 हजार 033  रुग्णांना डिस्चार्ज देिल्याची नोंद करण्यात आली आहे. 

पुणे महापालिका हद्दीत नव्याने 48 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर पुण्याबाहेरील 24 रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे.

_MPC_DIR_MPU_II

आजच्या नव्या संख्येसह मृतांची एकूण संख्या 7 हजार 659 इतकी झाली आहे. शहरात 1413 गंभीर रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

आजपर्यंत एकूण पॉझिटिव्ह रुग्णसंख्या 4 लाख 57 हजार 986  इतकी झाली आहे.  पुण्यात आतापर्यंत एकूण 4 लाख 28  हजार033 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, तर आज दिवसभरात 12,409 इतके आतापर्यंत एकूण 23 लाख 52 हजार 619 जणांचे स्वॅब टेस्टसाठीचे नमुने घेण्यात आले.

तरीही नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी. तोंडाला मास्क, हात धुणे आणि शारीरिक आंतरपालन करण्याचे आवाहन पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.