Pune Corona Update : शहरात 3 हजार 678 जणांना डिस्चार्ज; 2 हजार 879 नवे कोरोनाबाधित

0

एमपीसीन्यूज : पुणे शहरात आज 3 हजार 678  कोरोनामुक्त रुग्णांना आज डिस्चार्ज देण्यात आला. नव्याने 2 हजार 879  कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. तर  कोरोनामुळे आज 63  रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.

शहरात आज नव्याने 2  हजार 879  कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे शहरातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या आता 4  लाख 33  हजार 089  इतकी झाली आहे.

शहरातील 3 हजार 687  कोरोनामुक्त रुग्णांना आज डिस्चार्ज देण्यात आला असून पुणे शहरातील एकूण डिस्चार्ज संख्या 3  लाख 86  हजार 196 झाली आहे.

_MPC_DIR_MPU_II

पुणे शहरात आज एकाच दिवसात 15  हजार 098  नमुने घेण्यात आले आहेत. पुणे शहराची एकूण टेस्ट संख्या आता 21  लाख 90 हजार 448  इतकी झाली आहे.

शहरात उपचार घेणाऱ्या 39  हजार 839 रुग्णांपैकी 1,413 रुग्ण गंभीर तर 6,687 रुग्ण ऑक्सिजनद्वारे उपचार घेत आहेत.

पुणे महापालिका हद्दीत नव्याने 63 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.आजच्या नव्या संख्येसह मृतांची एकूण संख्या 7  हजार 054  इतकी झाली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Leave a comment