Pune Corona Update: पुण्यात आज 1879 नागरिक कोरोनामुक्त, 1390 नवे रुग्ण; 24 जणांचा मृत्यू

Pune Corona Update: Good News! Today in Pune 1879 citizens are corona free, 1390 new patients; 24 killed व्हेंटिलेटरवर आहेत.कोरोनाचे पुणे शहरात 65 हजार 966 रुग्ण झाले आहेत. 48 हजार 614 रुग्णांनी वेळीच उपचार घेतल्याने कोरोनावर मात केली आहे.

एमपीसी न्यूज – पुणे शहरात आता दिवसेंदिवस कोरोना रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. रविवारी (दि.9) तब्बल 1879 नागरिक कोरोनामुक्त झाले. कोरोनाच्या 6008 चाचण्या करण्यात आल्या. त्यामध्ये 1390 नवीन रुग्ण आढळले. 24 जणांचा मृत्यू झाला. 726 क्रिटिकल रुग्ण असून, त्यात 428 जण व्हेंटिलेटरवर आहेत.

कोरोनाचे पुणे शहरात 65 हजार 966 रुग्ण झाले आहेत. 48 हजार 614 रुग्णांनी वेळीच उपचार घेतल्याने कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत या रोगामुळे 1 हजार 540 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. 15 हजार 812 सक्रिय रुग्ण आहेत, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे देण्यात आली आहे.

गुलटेकडीतील 50 वर्षीय पुरुषाचा, हडपसरमधील 66 वर्षीय पुरुषाचा, विश्रांतवाडीतील 101 वर्षीय महिलेचा, ताडीवाला रोडवरील 79 वर्षीय पुरुषाचा, बिबवेवाडीतील 70 वर्षीय महिलेचा, धनकवडीतील 78 वर्षीय पुरुषाचा ससून हॉस्पिटलमध्ये, हडपसरमधील 65 वर्षीय महिलेचा नोबेल हॉस्पिटलमध्ये, हडपसरमधील 44 वर्षीय महिलेचा काशीबाई नवले हॉस्पिटलमध्ये.

रामवाडीतील 75 वर्षीय पुरुषाचा रुबी हॉल क्लिनिकमध्ये, शंकरनगरमधील 70 वर्षीय महिलेचा भारती हॉस्पिटलमध्ये, कर्वेनगरमधील 48 वर्षीय महिलेचा, सिंहगड रोडवरील 58 वर्षीय पुरुषाचा, शिवणेतील 63 वर्षीय पुरुषाचा, विश्रांतवाडीतील 68 वर्षीय पुरुषाचा दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये.

आंबेगावमधील 80 वर्षीय पुरुषाचा, वारजेतील 59 वर्षीय पुरुषाचा, फुरसुंगीतील 70 वर्षीय पुरुषाचा, धानोरीतील 65 वर्षीय महिलेचा ससून हॉस्पिटलमध्ये, शिवाजीनगरमधील 74 वर्षीय महिलेचा बुधराणी हॉस्पिटलमध्ये.

कोथरूडमधील 82 वर्षीय महिलेचा दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये, सिंहगड पेठमधील 53 वर्षीय पुरुषाचा युनिव्हर्सल हॉस्पिटलमध्ये, धनकवडीतील 51 वर्षीय पुरुषाचा दळवी हॉस्पिटलमध्ये, फुले पेठेतील 75 वर्षीय महिलेचा केईएम हॉस्पिटलमध्ये, पापडे भेकराईनगरमधील 60 वर्षीय पुरुषाचा नोबेल हॉस्पिटलमध्ये कोरोनामुळे मृत्यू झाला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.