Pune Corona Update : दिवसभरात उच्चांकी 7010 रुग्णवाढ; 4099 रुग्णांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज : पुण्यात आज दिवसभरात सर्वात जास्त रुग्ण आढळले असून आजची एका दिवसाची रुग्णाची संख्या 7010 झाली आहे. तर 4099 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.

आज पुणे परिसरातील 43 रुग्णांचा तर पुण्याबाहेरील 16 रुग्णांचा मृत्यू झाला असून 999 रुग्णांवर उपचार सुरु आहेत आणि 4465 रुग्ण ऑक्सिजन बेडवर उपचार घेत आहेत. आज दिवसभरात एकूण 23595 नमुन्यांची (स्वॅब) तपासणी करण्यात आली.

आजपर्यंत एकूण पॉझिटिव्ह रुग्णसंख्या 3 लाख 12 हजार 382 इतकी झाली आहे. तर ॲक्टिव्ह रुग्ण संख्या 48939 वर पोहोचली आहे. तसेच आजपर्यंत एकूण 5610 रुग्णांचा मृत्यू झाला.

तरीही नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी. तोंडाला मास्क, हात धुणे आणि शारीरिक आंतरपालन करण्याचे आवाहन पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.