Pune Corona Update : पुण्यात 1548 रुग्ण कोरोनामुक्त, 40 जणांचा मृत्यू, 1040 नवे रुग्ण

एमपीसी न्यूज – पुणे शहरात दिवसेंदिवस कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण वाढतच आहे. मंगळवारी (दि. 29 सप्टेंबर) तब्बल 1548 रुग्ण कोरोनामुक्त झाले. विशेष म्हणजे आजही कोरोना रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्यांचे प्रमाण जास्त आहे. आतापर्यंत 1 लाख 23 हजार 829 नागरिकांनी वेळीच उपचार घेऊन कोरोनावर यशस्वीरीत्या मात केली आहे.

आज 5 हजार 678 कोरोनाच्या चाचण्या करण्यात आल्या. त्यामध्ये 1040 नवे रुग्ण आढळले. 40 जणांचा मृत्यू झाला. 938 क्रिटिकल रुग्ण असून, त्यात 519 जण व्हेंटिलेटरवर आहेत.

कोरोनाचे पुणे शहरात 1 लाख 43 हजार 955 रुग्ण झाले आहेत. आतापर्यंत या रोगामुळे 3 हजार 446 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. 16 हजार 680 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे देण्यात आली आहे.

पुणे शहरात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दुकाने आणि मार्केटमध्ये येत असलेले नागरिकांनी मास्क वापरणे, सामाजिक अंतर ठेवणे, वेळोवेळी परिसर सॅनिटाईज करणे बंधनकारक करण्यात आले आहे. तर, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रेमडेसिव्हिर या इंजेक्शनचा साठा हॉस्पिटलमध्ये पुरेसा प्रमाणात उपलब्ध आहे.

मात्र, रुग्णांच्या नातेवाईकांना हे इंजेक्शन बाहेरून चढ्या दराने घ्यावे लागत आहे. रुबी हॉल, सह्याद्री, दीनानाथ मंगेशकर, नोबेल, आदित्य बिर्ला, भारती, सूर्या, पूना हॉस्पिटलमध्ये हे इंजेक्शन उपलब्ध आहेत.

जिल्ह्यात बारामती, सासवडसह अन्य ठिकाणीही इजेक्शन उपलब्ध आहेत. या इंजेक्शनचा काळा बाजार करणाऱ्या विरोधात कडक कारवाई करण्याचा इशारा प्रशासनातर्फे देण्यात आला आहे. मात्र, रुग्णांच्या नातेवाईकांची सध्या लूट सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.