Pune corona Update : पुण्यात आतापर्यंत तब्बल 1 लाख 532 नागरिकांची कोरोनावर मात

आज, सोमवारी 1100 नवे रुग्ण आढळले.

एमपीसी न्यूज – पुण्यात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असताना सोमवारी (दि. 14 सप्टेंबर) एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. आतापर्यंत 1 लाख 532 नागरिकांनी वेळीच उपचार घेऊन कोरोनावर यशस्वीरीत्या मात केली आहे. पुणे शहरात कोरोनाच्या आजारातून रुग्ण मोठ्या प्रमाणात बरे होत आहेत.

आज, सोमवारी 2 हजार 807 कोरोनाच्या चाचण्या करण्यात आल्या. त्यामध्ये 1100 नवे रुग्ण आढळले. 1456 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. 39 जणांचा मृत्यू झाला.

सध्या शहरात 978 क्रिटिकल रुग्ण असून, त्यात 479 जण व्हेंटिलेटरवर आहेत. कोरोनाचे पुणे शहरात 1 लाख 20 हजार 757 रुग्ण झाले आहेत. आतापर्यंत या रोगामुळे 2 हजार 832 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. 17 हजार 393 ॲ क्टिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे देण्यात आली आहे.

सध्या पुणे शहरात केवळ एक टक्केच कोरोनाच्या चाचण्या करण्यात येत आहेत. त्यात आणखी वाढ करण्याची मागणी महापालिका आयुक्तांकडे करण्यात आली आहे. कोरोनावर सध्या काहीही औषध नसले तरी सॅनिटायजर, मास्क, फिजिकल डिस्टन्स पाळण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

कोरोनाचे संकट आटोक्यात आणण्यासाठी पुणे महापालिकेतर्फे विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. पुणे शहरात कोरोनाचे रुग्ण वाढत असले तरी नागरिकांनी घाबरून जाऊ नये, तर काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पुण्यात सर्वाधिक कोरोनाच्या चाचण्या करण्यात येत आहेत. दरम्यान, पुणे शहरातील कोरोनाचे संकट आणखीनच गंभीर होत चालले आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केवळ आठवड्यालाच एक बैठक न घेता मुक्काम ठोकावा, अशी मागणी करण्यात येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.