Pune Corona Update : दिवसभरात 5651 पाझिटिव्ह रुग्णांची वाढ तर 4361 रुग्णांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – पुण्यात आज 5651 कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. तर 4361 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

आज पुणे परिसरातील 54 रुग्णांचा तर पुण्याबाहेरील 13 रुग्णांचा मृत्यू झाला असून 957 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आजपर्यंत एकूण पॉझिटिव्ह रुग्णसंख्या 3 लाख 5 हजार 372 इतकी झाली आहे. तर ॲक्टिव्ह रुग्ण संख्या 46071 वर पोहोचली आहे. तसेच आजपर्यंत एकूण 5567 रुग्णांचा मृत्यू झाला. तसेच आज 26120 इतक्या जणांची स्वॅब तपासणी घेण्यात आली.

तरीही नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी. तोंडाला मास्क, हात धुणे आणि शारीरिक आंतरपालन करण्याचे आवाहन पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.