Pune Corona Update : रुग्णवाढ कायम , दिवसभरात 963 नवे रुग्ण; 659 रुग्णांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज : पुण्यात आज शनिवारी (दि.6) दिवसभरात 963 नवे रुग्ण सापडले.  659 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तर 4  रुग्णांचा मृत्यू झाला. रुग्णसंख्येत वाढ होत असल्यामुळे चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. आज एका दिवसात कोरोना रुग्णांचा 950 चा टप्पा पार झाला आहे.

पुणे शहरात आता एकूण 321  गंभीर रुग्णांवर उपचार सुरू असून 872  हून जास्त रुग्ण ऑक्सिजन बेडवर आहेत. आजपर्यंत एकूण पॉझिटिव्ह रुग्णसंख्या 2  लाख 73  हजार 46  इतकी झाली आहे. तर ॲक्टिव्ह रुग्ण संख्या 6460  वर पोहोचली आहे. आजपर्यंत एकूण 4885 रुग्णांचा मृत्यू झाला.

महापालिकेच्या आकडेवारीनुसार, कोरोनाबाधितांची संख्या संथगतीने वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी. तोंडाला मास्क, हात धुणे आणि शारिरीक आंतरपालन करावे. तीव्र किंवा सौम्य लक्षणे आढळल्यास तात्काळ वैद्यकीय उपचार घ्यावे असे कळकळीचे आवाहन पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.