Pune Corona Update: नव्या कोरोना रुग्णांपेक्षा बऱ्या झालेल्या रुग्णांचे प्रमाण जास्त; 1599 रुग्णांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – पुणे शहरात रविवारी (27 सप्टेंबर) तब्बल 1599 रुग्ण कोरोनामुक्त झाले. विशेष म्हणजे आज कोरोना रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्यांचे प्रमाण जास्त आहे. आतापर्यंत 1 लाख 21 हजार 176 नागरिकांनी वेळीच उपचार घेऊन कोरोनावर यशस्वीरीत्या मात केली आहे.

आज 5 हजार 614 कोरोनाच्या चाचण्या करण्यात आल्या. त्यामध्ये 1,548 नवे रुग्ण आढळले. 41 जणांचा मृत्यू झाला.

कोरोनाचे पुणे शहरात 1 लाख 42 हजार 136 रुग्ण झाले आहेत. आतापर्यंत या रोगामुळे 3 हजार 373 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. 17 हजार 587 सक्रिय रुग्ण आहेत. त्यापैकी 940 क्रिटिकल रुग्ण असून, त्यात 520 जण व्हेंटिलेटरवर आहेत, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे देण्यात आली आहे.

पुणे शहरात कोरोनाच्या चाचण्या वाढविण्यात आल्याने रुग्ण वाढत असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.  दुकाने आणि मार्केटमध्ये येत असलेले नागरिकांनी मास्क वापरणे, सामाजिक अंतर ठेवणे, वेळोवेळी परिसर सॅनिटाईज करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

जनता कर्फ्यू, बंद पाळण्यात आल्यावर कोरोनाच्या रुगांना काही प्रमाणात अटकाव घालता येत असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सांगितले. त्याचा प्रत्यय बारामतीमध्ये आला आहे. पुण्यातील कोरोनाचे संकट आटोक्यात आणण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

पुणे शहरात दिवसेंदिवस कोरोनाच्या आजारातून बरे होणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.