Pune Corona Update : सक्रिय रुग्णांची संख्या घटतेय ; 387 नवे रुग्ण, 393 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज : पुणे शहर झिरो कंटेंन्मेट झोन झाले असून शहरातील कोविड केयर सेंटरची संख्या दोन आकड्यावर आली आहे. आज गुरूवारी 387 नवे कोरोना रुग्ण सापडले असून 393 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. दिलासादायक बाब म्हणजे सक्रिय रुग्णांची संख्याही 3 हजारांच्या खाली घटत आहे.

महापालिकेची रुग्णालये, खासगी रुग्णालयांमधील प्रयोगशाळांमध्ये 5 हजार 43 नमुन्यांची आरटीपीसीआर आणि रॅपीड ॲन्टिजेन तपासण्या करण्यात आल्या. त्यापैकी 387 नवे रुग्ण सापडले. तर 202 जण अत्यवस्थ गंभीर असून 288 रुग्ण ऑक्सिजन बेडवर उपचार घेत आहेत.

आज सक्रिय रुग्णांची संख्या 2 हजार 678 इतकी आहे. तर केवळ 3 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत 1 लाख 73 हजार 333 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. एकूणच कोरोना रुग्णवाढीचा दरही कासवगतीने घटत असल्याचे आशादायक चित्र आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.