Pune Corona Update: कोरोनाबाधितांच्या संख्येने ओलांडला 20 हजारांचा टप्पा, मृतांचा आकडा 703 वर

Pune Corona Update: Number of Corona Patients crosses 20,000 mark, death toll rises to 703 पुणे शहरात 61.39 टक्के कोरोनामुक्त, 3.40 टक्के रुग्णांचा मृत्यू तर 35.21 टक्के सक्रिय कोरोना रुग्ण

एमपीसी न्यूज – दिवसभरात पुणे शहरात आज (शनिवारी) 819 नवीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. त्यामुळे शहरातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 20 हजार 668 झाली आहे. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. 

आज पॉझिटिव्ह रिपोर्ट प्राप्त झालेल्या रुग्णांमध्ये ससून रुग्णालयातील 21, नायडू रुग्णालयातील 573, तर अन्य खाजगी रुग्णालयांमधील 225 रुग्णांचा समावेश आहे.

त्याच बरोबर आज (शनिवारी) दिवसभरात 399 रुग्ण बरे झाले. पुण्यात आतापर्यंत एकूण 12,689 रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले आहेत. शहरातील 61.39 टक्के रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

पुणे शहरात आज 18 कोरोनाबाधितांच्या मृत्यूची झाली. त्यामुळे शहरातील कोरोना बळींचा आकडा 703 वर जाऊन पोहचला आहे. शहरातील कोरोना मृत्यूदर 3.40 टक्के झाला आहे.

शहरातील सक्रिय रुग्णांची संख्या 7 हजार 276 (35.20 टक्के) असून त्यापैकी गंभीर रुग्ण 385 आहेत. त्यापैकी 56 रुग्ण व्हेंटीलेटरवर आहेत, अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे देण्यात आली.

करोना चाचणीसाठी आज 3,757 व्यक्तींचे स्वॉबचे नमुने घेण्यात आले. पुणे शहारात आतापर्यंत एकूण 1 लाख 32 हजार 205 व्यक्तींचे स्वॉब नमुने संकलित करण्यात आले आहेत. त्यापैकी एकूण 20,668 व्यक्ती करोनाबाधित आढळून आल्या आहेत, तर 7,276 अ‍ॅक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.