Pune Corona Update : रुग्णवाढ कायम, आज 1925 नव्या रुग्णांची नोंद; 677 जणांना डिस्चार्ज

एमपीसीन्यूज : पुणे शहरात आज, मंगळवारी नव्याने 1925 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे शहरातील कोरोनाच्या एकूण रुग्णांची संख्या  2 लाख 21 हजार 210  इतकी झाली आहे. तर कोरोना उपचारातून बरे झालेल्या शहरातील 677  जणांना आज डिस्चार्ज देण्यात आला.

पुणे शहरात आज एकाच दिवसात 8 हजार 044 नमुने घेण्यात आले आहेत. पुणे शहराची एकूण टेस्ट संख्या आता 12 लाख 63  हजार 696  इतकी झाली आहे. शहरात सध्या 13225  सक्रिय रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

_MPC_DIR_MPU_II

कोरोना उपचारातून बरे झालेल्या 677 जणांना आज डिस्चार्ज देण्यात आला. पुणे शहरातील एकूण डिस्चार्ज संख्या 2 लाख 03 हजार 016  झाली आहे.

पुणे महापालिका हद्दीत नव्याने 7  कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आजच्या नव्या संख्येसह मृतांची एकूण संख्या 4 हजार 969  इतकी झाली आहे. पुणे शहरात उपचार घेणाऱ्या 13  हजार225  रुग्णांपैकी 394  रुग्ण गंभीर तर 798  रुग्ण ऑक्सिजनद्वारे उपचार घेत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.