Pune Corona Update : रुग्णवाढ कायम, आज 3098 रुग्णांची नोंद; 1698 रुग्णांचा डिस्चार्ज

एमपीसीन्यूज : पुणे शहरात आज नव्याने 3 हजार 098  कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून शहरातील एकूण संख्या आता 2 लाख 40 हजार 834  इतकी झाली आहे. तर 1 हजार 698 कोरोनामुक्त रुग्णांना आज डिस्चार्ज देण्यात आला.  22 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.

पुणे शहरात आज एकाच दिवसात 11  हजार 310 नमुने घेण्यात आले आहेत. पुणे शहराची एकूण टेस्ट संख्या आता 13 लाख 49  हजार 999 इतकी झाली आहे.

_MPC_DIR_MPU_II

शहरातील 1 हजार 698 कोरोनाबाधितांना आज डिस्चार्ज देण्यात आला. आजपर्यंत शहरातील एकूण डिस्चार्ज संख्या 2  लाख 11  हजार 304  झाली आहे.

शहरात उपचार घेणाऱ्या 24  हजार 440  रुग्णांपैकी 555  रुग्ण गंभीर, तर 1020  रुग्ण ऑक्सिजनद्वारे उपचार घेत आहेत.

महापालिका हद्दीत नव्याने 22  कोरोनामुक्त रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आजच्या नव्या संख्येसह मृतांची एकूण संख्या 5 हजार 90  इतकी झाली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.