Pune Corona Update: जुलैअखेर रुग्णसंख्या 47 हजारांच्या पुढे जाण्याचा अंदाज – महापौर

Pune Corona Update: Patients are expected to cross 47,000 by the end of July - Mayor कोरोना विरुद्ध लढ्यासाठी मदतीची पुणे महापालिकेची राज्य शासनाकडे मागणी

एमपीसी न्यूज – आजचा रुग्ण दुपटीचा रेट पाहता जुलै अखेर कोरोना रुग्णांची संख्या 47 हजारांच्या पुढे जाईल, याचा विचार करता आयसोलेशन बेडस 614, आयसीयू बेड 400 आणि व्हेंटिलेटर बेडस 200 ने कमी पडण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने बेड्सची उपलब्धता करून द्यावी, अशी मागणी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केली. 

शुक्रवारी पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित कोरोना निर्मूलन आढावा बैठकीत महापौरांनी विविध मुद्दे मांडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे लक्ष वेधले.

खाजगी लॅब व खाजगी हॉस्पिटल यांचा आणि महापालिकेचा समन्वय अधिक चांगला होणे गरजेचे आहे, यासाठी राज्य सरकारने भूमिका घ्यावी. महापालिकेच्या शहरी गरीब योजनेअंतर्गत 80 हॉस्पिटलना कोरोनाच्या उपचार करण्यासाठी निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे दर महिन्याला 25 कोटींचा अतिरिक्त बोजा महापालिकेवर येणार आहे, असे महापौर मोहोळ यांनी सांगितले.

_MPC_DIR_MPU_II

पूर्वीचा 175 कोटी आणि आत्ताचा 25 कोटी असा आर्थिक बोजा महापालिकेवर बसणार आहे, तरी राज्यसरकारने याबाबतीत विचार करण्याची गरज आहे. खाजगी लॅबच्या माध्यमातून स्वॅब तपासणीसाठी प्रति रुग्ण 1,800 रुपये महापालिका निधीतून उपलब्ध करून देणार आहे. टेस्टिंग क्षमता वाढविणे, महापालिकेच्या यंत्रणांमध्ये डॉक्टर, नर्सेस व पॅरामेडिकल स्टाफची आवश्यकता आहे, तरी ती तात्काळ पूर्ण करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली.

आर्थिक परिस्थिती चांगला असलेला रुग्ण खाजगी हॉस्पिटलमध्ये टेस्टसाठी गेल्यानंतर रिपोर्ट पाॅझिटिव्ह आल्यानंतर तीव्र, मध्यम लक्षणे आहेत ते न पाहता सर्व कुटुंबासाठी 4-5 बेड्स आडवले जातात, त्यामुळे गंभीर रुग्णाला बेड मिळत नाहीत. यासंदर्भात खाजगी हॉस्पिटलला सूचना दिल्या पाहिजेत अशी भूमिका मांडली.

आर्थिक क्षमता चांगली असणार्‍या नागरिकांनी, त्यांचे रिपोर्ट पाॅझिटिव्ह आल्यानंतर महापालिकेच्या क्वारनंटाईन सेंटर, आयसोलेशन सेंटरमध्ये भरती व्हावे, जेणेकरून खाजगी हॉस्पिटलमध्ये गंभीर रुग्ण व को- माॅबिड रुग्णांची खाजगी हॉस्पिटल जागा उपलब्ध होण्याच्या दृष्टिकोनातून खाजगी हॉस्पिटलनी विचार करावा, यासंबंधी सूचना महापौर मोहोळ यांनी मांडल्या.

अजित पवारांनी अधिकाऱ्यांना खडसावले
मुंबईत कोरोना आटोक्यात येत असताना पुण्यात का वाढतो, लॉकडाऊनचे पालन न करणाऱ्या नागरिकांवर कारवाई करा, कोणत्याही परिस्थितीत कोरोनावर नियंत्रण आणा, आशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना खडसावले. लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर शहरी आणि ग्रामीण भागात कोरोना संसर्ग वाढत आहे. नागरिक मास्क न लावता फिरत आहेत. लॉकडाऊन शिथिल झाले म्हणजे अधिकाऱ्यांची जबाबदारी संपली, असे होत नाही. फिजिकल डिस्टन्स राखले जात नाही. त्यामुळे कोरोना वाढता आहे. नियमांचे पालन न करणाऱ्या नागरिकांवर कारवाई करा, कोरोना आटोक्यात आणा, एकदा सांगतो, परत सांगायला लावू नका, अशा शब्दांत अजित पवार यांनी अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1