Pune Corona Update : रुग्णवाढ कायम ! दिवसभरात नव्या 2752 रुग्णांची नोंद

एमपीसीन्यूज : पुणे शहरात आज, गुरुवारी नव्याने 2 हजार 752  कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे पुणे शहरातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या आता 2 लाख 26  हजार 549  इतकी झाली आहे. दरम्यान, शहरात आज 22  कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली.

शहरातील 885  कोरोना उपचारातून बरे झालेल्या रुग्णांना आज डिस्चार्ज देण्यात . त्यामुळे शहरातील एकूण डिस्चार्ज संख्या 2  लाख 4  हजार 670 झाली आहे.

पुणे शहरात आज एकाच दिवसात 11  हजार 835  नमुने घेण्यात आले. आजपर्यंतची एकूण टेस्ट संख्या आता 12 लाख 86 हजार 761 इतकी झाली आहे.

पुणे महापालिका हद्दीत नव्याने 22 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आजच्या नव्या संख्येसह मृतांची एकूण संख्या 5 हजार 002 इतकी झाली आहे.

पुणे शहरात उपचार घेणाऱ्या 16  हजार 877 रुग्णांपैकी 440 रुग्ण गंभीर तर 846  रुग्ण ऑक्सिजनद्वारे उपचार घेत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.