Pune Corona Update : पुण्यात नव्या रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त नागरिकांची संख्या जास्त

एमपीसी न्यूज – पुणे महानगरपालिका हद्दीत आजही नव्या रुग्णसंख्येपेक्षा कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या अधिक नोंदवली गेली आहे. आज 3978 इतक्या नव्या तर 4936 कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या आहे.

आज पुणे परिसरातील 58 रुग्णांचा तर पुण्याबाहेरील 27 रुग्णांचा मृत्यू झाला असून 1379 रुग्णांवर उपचार सुरू आहेत आणि 6718 रुग्ण ऑक्सिजन बेडवर उपचार घेत आहेत.

आजपर्यंत एकूण पॉझिटिव्ह रुग्णसंख्या 410504 इतकी झाली आहे. तर ॲक्टिव्ह रुग्ण संख्या 44059 वर पोहोचली आहे. तसेच आजपर्यंत एकूण 6669 रुग्णांचा मृत्यू झाला. तर 3 लाख 49 हजार 776 जणांना आजपर्यंत डिस्चार्ज मिळाला आहे.

तरीही नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी. तोंडाला मास्क, हात धुणे आणि शारीरिक आंतरपालन करण्याचे आवाहन पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.