-MPC-TOP-MOST-BANNER-I

Pune Corona Update : पुण्याची कोरोनामुक्तीकडे वाटचाल, आज 380 रुग्णांची नोंद

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसीन्यूज : पुणे शहरात कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात येत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. शहरात लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर कोरोनाबाधित रुग्णांची संख्या नियंत्रणात आली आहे. आज पुण्यात एकूण 380 रुग्णांची नोंद झाली. तर 641 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून 28 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

राज्यात आता रोजच्या कोरोनामुक्त होणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ होताना दिसून येत आहे. दररोज आढळणाऱ्या कोरोना बाधित रुग्णांपेक्षा कोरोनातून बरे झालेल्यांची संख्या काही दिवसांपासून अधिक असल्याचे समोर येत आहे. असे असले तरी कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या संख्येतही वाढ सुरूच आहे.

पुण्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता ४ लाख 70हजार 956 वर पोहचली आहे. तर आजपर्यंत 8 हजार 379 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान आज ७५१ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर आज अखेर 4 लाख 59 हजार 015 रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.

पुण्यात सध्या 4 हजार 563 रुग्णांवर उपचार सुरु आहे. तर आज शहरात 6 हजार 909 नमुन्यांची (स्वॅब) तपासणी करण्यात आली.

 

.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1POST DOWn