Pune corona Update : शहरात आतापर्यंत 62 हजार 349 रुग्ण कोरोनामुक्त, आज 1669 नवे रुग्ण, 33 मृत्यू

सध्या शहरात 802 क्रिटिकल रुग्ण असून, त्यात 486 जण व्हेंटिलेटरवर आहेत.

एमपीसी न्यूज – पुणे शहरात आतापर्यंत तब्बल 62 हजार 349 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. गुरुवारी 6 हजार 747 कोरोनाच्या चाचण्या करण्यात आल्या. त्यामध्ये 1669 नवे रुग्ण आढळले. 33 जणांचा मृत्यू झाला.

सध्या शहरात 802 क्रिटिकल रुग्ण असून, त्यात 486 जण व्हेंटिलेटरवर आहेत. कोरोनाचे पुणे शहरात 79 हजार 37 रुग्ण झाले आहेत. आतापर्यंत या रोगामुळे 1 हजार 882 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. 14 हजार 806 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे देण्यात आली आहे.

सिंहगड रोडवरील 54 वर्षीय पुरुषाचा मोरया हॉस्पिटलमध्ये, टिंगरे नगरमधील 72 वर्षीय महिलेचा बुधराणी हॉस्पिटलमध्ये, शिवणेतील 77 वर्षीय महिलेचा श्री मिनरवा हॉस्पिटलमध्ये, भवानी पेठेतील 47 वर्षीय महिलेचा ताराचंद हॉस्पिटलमध्ये, सिंहगड रोडवरील 65 वर्षीय पुरुषाचा सिम्बॉयसिस हॉस्पिटलमध्ये कोरोनामुळे मृत्यू झाला.

शंकरशेठ रोडवरील 74 वर्षीय महिलेचा, सहकारनगरमधील 64 वर्षीय पुरुषाचा राव नरसिंग होममध्ये, हडपसरमधील 73 वर्षीय पुरुषाचा बुधराणी हॉस्पिटलमध्ये, गोखले नगरमधील 62 वर्षीय महिलेचा ससून हॉस्पिटलमध्ये, राजेंद्र नगरमधील 60 वर्षीय पुरुषाचा भारती हॉस्पिटलमध्ये, हडपसरमधील 45 वर्षीय महिलेचा नोबेल हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला.

शिवाजीनगरमधील 45 वर्षीय पुरुषाचा, वडगांवशेरीमधील 50 वर्षीय पुरुषाचा, येरवड्यातील 68 वर्षीय महिलेचा, धानोरीतील 85 वर्षीय पुरुषाचा, वारजेतील 73 वर्षीय महिलेचा, कोंढाव्यातील 60 आणि 56 वर्षीय पुरुषाचा ससून हॉस्पिटलमध्ये, धनकवडीतील 70 वर्षीय पुरुषाचा, वाकडेवाडीतील 78 वर्षीय पुरुषाचा पुना हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला.

वडगांवमधील 30 वर्षीय पुरुषाचा, शिवणेतील 69 वर्षीय पुरुषाचा, सिंहगड रोडवरील 73 वर्षीय पुरुषाचा, शनिवार पेठेतील 63 वर्षीय पुरुषाचा दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये, येरवड्यातील 80 वर्षीय पुरुषाचा ओ अँड पी हॉस्पिटलमध्ये, शिवाजीनगरमधील 55 वर्षीय पुरुषाचा AIMS हॉस्पिटलमध्ये कोरोनामुळे मृत्यू झाला.

पद्मावतीमधील 72 वर्षीय पुरुषाचा सीमबायोसिस हॉस्पिटलमध्ये, फुरसुंगीतील 70 वर्षीय महिलेचा मेडिकेअर हॉस्पिटलमध्ये, सदाशिव पेठेतील 70 वर्षीय महिलेचा नायडू हॉस्पिटलमध्ये, बिबवेवाडीतील 72 वर्षीय पुरुषाचा काशीबाई नवले हॉस्पिटलमध्ये, हडपसरमधील 37 वर्षीय पुरुषाचा सुर्या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये, येरवड्यातील 58 वर्षीय पुरुषाचा, हडपसरमधील 55 वर्षीय पुरुषाचा ससून हॉस्पिटलमध्ये कोरोनामुळे मृत्यू झाला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.