Pune Corona Update: शहरात सध्या ‘हे’ आहेत कोरोनाचे हॉटस्पॉट वॉर्ड!

एमपीसी न्यूज – सिंहगड रोड, वारजे-कर्वेनगर, नगररोड-वडगांवशेरी, धनकवडी-सहकारनगर, औंध-बाणेर हे परिसर कोरोनाचे हॉटस्पॉट असल्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी म्हटले आहे. पुणे शहरातील कोरोनाचे संकट आटोक्यात आणण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत.

पुणे शहरात हडपसर-मुंढवा, धनकवडी-सहकारनगर, कसबा-विश्रामबागवाडा परिसरात कोरोना रुग्णांची संख्या वाढतीच आहे. क्षेत्रीय कार्यालय निहाय कोरोनाबाधितांची संख्या पुढीलप्रमाणे आहे.

हडपसर-मुंढवा 10 हजार 935, धनकवडी-सहकारनगर 10 हजार 612, कसबा-विश्रामबागवाडा 9 हजार 186, वारजे-कर्वेनगर 8 हजार 457, नगररोड-वडगांवशेरी 8 हजार 456, सिंहगड रोड 8 हजार 267, बिबवेवाडी 7 हजार 192, कोथरूड-बावधन 7 हजार 121, येरवडा-कळस धानोरी 6 हजार 606, ढोले-पाटील रोड 6 हजार 232, भवानी पेठ 5 हजार 528, कोंढवा-येवलेवाडी 5 हजार 265,  औंध-बाणेर 5 हजार 23, शिवाजीनगर-घोलेरोड 4 हजार 790, वानवडी-रामटेकडी 4 हजार 635, असे 12 सप्टेंबरपर्यंत 1 लाख 17 हजार 679 कोरोना रुग्ण झाले आहेत.

19 सप्टेंबरपर्यंत 1 लाख 30 हजार 81 कोरोना रुग्ण आहेत. त्यामध्ये 1 लाख 9 हजार 371 रुग्णांनी वेळीच उपचार घेऊन कोरोनावर मात केली आहे. या आजारामुळे आतापर्यंत 3 हजार 46 नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.