Pune Corona Update : धोका वाढतोय ! दिवसभरात नवे 3111 कोरोनाबाधित

शहरातील 1  हजार 094 कोरोनाबाधितांना डिस्चार्ज; 16 मृत्यू

एमपीसीन्यूज : पुणे शहरात आज, शनिवारी नव्याने 3 हजार 111 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे शहरातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या आता 2 लाख 32  हजार 494  इतकी झाली आहे.

पुणे महापालिका हद्दीत नव्याने 16  कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. आजच्या नव्या संख्येसह मृतांची एकूण संख्या 5  हजार 033  इतकी झाली आहे.

पुणे शहरात आज एकाच दिवसात 14  हजार 484  नमुने घेण्यात आले आहेत. त्यामुळे शहराची एकूण टेस्ट संख्या आता 13  लाख 13  हजार 870 इतकी झाली आहे.

शहरात उपचार घेणाऱ्या 20  हजार 889  रुग्णांपैकी 538  रुग्ण गंभीर, तर 921  रुग्ण ऑक्सिजनद्वारे उपचार घेत आहेत.

शहरातील 1  हजार 094 कोरोनाबाधितांना आज डिस्चार्ज देण्यात आला असून पुणे शहरातील एकूण डिस्चार्ज संख्या 2  लाख 06 हजार 572 झाली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.