Pune Corona Update : पुणे शहरात ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या घटतेय, 24 तासात 214 नवे रुग्ण

शहरातील सक्रिय रुग्णांची संख्या 10 हजारांच्या खाली

एमपीसी न्यूज : पुणे शहरात आज दिवसभरात नव्याने केवळ 214 रुग्ण आढळले. तर आजमितीला शहरातील सक्रिय रुग्णांची संख्या दहा हजारांच्या खाली म्हणजे 9,198 इतकी आल्यामुळे संसर्ग दर घटत असल्याचे समाधानकारक चित्र निर्माण होत आहे.

आज 505 करोनामुक्त रुग्ण घरी सोडले असून आत्तापर्यंत 1 लाख 44 हजार 432 करोनामुक्त रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे.

दिवसभरात 18 रुग्णांचा मृत्यू झाला त्यापैकी 9 रुग्ण पुण्याबाहेरील होते.

सद्यस्थितीत पुणे शहरात 9,198 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. यातील 799 रुग्ण अत्यावस्थ आहेत. यातील 431 रुग्णांवर व्हेंटिलेटरवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली.

दरम्यान, शहर आणि उपनगरातील क्षेत्रीय कार्यालय स्तरावर ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहीमे अंतर्गत घरोघरी जाऊन नागरिकांची तपासणी आरोग्य विभागाच्या पथकांद्वारे केली जात आहे. तरीही नागरीकांनी मास्क, हँड सॅनिटायजर आणि सोशल डिस्टंन्सिग नियमांचे पालन करावे. तसेच सौम्य ते तीव्र लक्षणे आढळल्यास तातडीने अँटीजेन, स्वॅब टेस्टींग करून खबरदारी घ्यावी. तसेच नजिकच्या डॉक्टरकडून औषधोपचार सुरू करण्याचे आवाहन महापालिका प्रशासनाकडून केले जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.