Pune Corona Update : कोरोना आजारातून बरे होणाऱ्यांचे प्रमाण वाढतेय ; 1256 रुग्णांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – पुणे शहरात कोरोनाच्या आजारातून बरे होणाऱ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतेच आहे. शुक्रवारी (दि. 25 सप्टेंबर) तब्बल 1256 रुग्ण कोरोनामुक्त झाले. आतापर्यंत 1 लाख 17 हजार 882 नागरिकांनी वेळीच उपचार घेऊन कोरोनावर यशस्वीरीत्या मात केली आहे.

आज 6 हजार 142 कोरोनाच्या चाचण्या करण्यात आल्या. त्यामध्ये 1621 नवे रुग्ण आढळले. 41 जणांचा मृत्यू झाला. 949 क्रिटिकल रुग्ण असून, त्यात 523 जण व्हेंटिलेटरवर आहेत.

कोरोनाचे पुणे शहरात 1 लाख 38 हजार 951 रुग्ण झाले आहेत. आतापर्यंत या रोगामुळे 3 हजार 296 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. 17 हजार 773 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे देण्यात आली आहे.

पुणे शहरात कोरोनाच्या चाचण्या वाढविण्यात आल्याने रुग्ण वाढत असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. दुकाने आणि मार्केटमध्ये येत असलेले नागरिकांनी मास्क वापरणे, सामाजिक अंतर ठेवणे, वेळोवेळी परिसर सॅनिटाईज करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

जनता कर्फ्यु, बंद पाळण्यात आल्यावर कोरोनाच्या रुगांना काही प्रमाणात अटकाव घालता येत असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सांगितले. त्याचा प्रत्यय बारामतीमध्ये आला आहे. पुण्यातील कोरोनाचे संकट आटोक्यात आणण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.