Pune Corona Update : पुण्यात नवे 198 रुग्ण ; 306 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज : देशात कोरोना लसीकरणाला सुरूवात झाली आहे. त्या पार्श्वभुमीवर पुण्यात 198 नवे रुग्ण सापडले असून 306 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार पुणे शहर आणि उपनगरात ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या 1626 इतकी झाली आहे. आज 1 रुग्णाचा मत्यू झाला. आजपर्यंत 109 रुग्ण गंभीर असून ऑक्सिजन बेडवर उपचार घेत आहेत.

नागरिकांनी घराबाहेर पडताना तोंडाला मास्क लावावे, हात स्वच्छ धुवावे तसेच शारिरीक आंतरपालन करण्याचे नियम पाळावेत. तसेच कोरोनाची लक्षणे आढळल्यास नजिकच्या डॉक्टरांकडून तपासणी करून औषधोपचार करावा, असे आवाहन पुणे महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.