Pune Corona Update : पुण्यात आज 3286 रुग्णांची नोंद; 1200 डिस्चार्ज, 23 मृत्यू

एमपीसीन्यूज : पुणे शहरात आज ( गुरुवार) नव्याने 3286 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून पुणे शहरातील एकूण संख्या आता 2 लाख 47 हजार 629 इतकी झाली.  दिवसभरात 1 हजार 200 रुग्णांना डिस्चार्ज तर नव्याने 23 मृत्यूची नोंद झाली.

पुणे महापालिका हद्दीत शहरात २८ हजार ५७८ सक्रिय रुग्ण आहेत.  आजच्या नव्या संख्येसह मृतांची एकूण संख्या 5 हजार 137 इतकी झाली आहे. शहरातील 1 हजार 200 कोरोनाबाधितांना आज डिस्चार्ज देण्यात आला.  शहरातील एकूण डिस्चार्ज संख्या 2 लाख 13 हजार 914   झाली आहे.

_MPC_DIR_MPU_II

शहरात आज एकाच दिवसात 16  हजार 578 नमुने घेण्यात आले. त्यामुळे शहराची एकूण टेस्ट संख्या आता 13  लाख 66  हजार 184  इतकी झाली आहे.

पुणे शहरात उपचार घेणाऱ्या  रुग्णांपैकी 599 रुग्ण गंभीर, तर 1498 रुग्ण ऑक्सिजनद्वारे उपचार घेत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.