_MPC_DIR_MPU_III -NEW PUN  21 JUN 2021

Pune Corona Update : शहरात 3,451 कोरोनामुक्तांना डिस्चार्ज ; 2,451 नवीन रुग्णांची नोंद

एमपीसीन्यूज : पुणे शहरामध्ये गेल्या 24 तासांमध्ये कोरोनाच्या नवीन रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त असल्याने थोडासा दिलासा मिळाला आहे. गेल्या 24 तासात 2 हजार 451 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर 3 हजार 451 रुग्ण बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.

पुणे शहरात आतापर्यंत कोरोना बाधित रुग्णांची संख्या 4 लाख 41 हजार 702 वर पोहचली आहे. पुणे शहरात दिवसभरात 85 रुग्णांचा मृत्यू झाला. यामध्ये 64 रुग्ण शहरातील आहेत तर 21 रुग्ण शहराबाहेरील आहेत. आतापर्यंत 7 हजार 245 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

_MPC_DIR_MPU_II

दरम्यान, आज 3 हजार 491 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत 3 लाख 95 हजार 976 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आज (शुक्रवार) दिवसभरात शहरातील विविध केंद्रावर 16 हजार 763 स्वॅब तपासणी करण्यात आली.

शहरात सक्रिय रुग्ण संख्या 38 हजार 481 इतकी आहे. यापैकी 1411रुग्ण गंभीर आहेत, अशी माहिती पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

पुणे शहरातील रुग्णांच्या संख्येत मागील काही दिवसांपासून घट होत असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. कोरोना संक्रमित रुग्ण बरे होत असताना मृत्यूचे प्रमाण वाढत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.