_MPC_DIR_MPU_III

Pune Corona Update : दिवसभरात 256 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ !

एमपीसी न्यूज : पुण्यात आज दिवसभरात 256 नवे रुग्ण सापडले. तर 113 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.

_MPC_DIR_MPU_IV
_MPC_DIR_MPU_II

आज करोनाबाधित एक रुग्णांचा मृत्यू झाला. एकूण 134 गंभीर रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 233 जण ऑक्सिजन बेडवर उपचार सुरू आहेत. आजपर्यंत एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 1 लाख 94 हजार 51 इतकी झाली आहे. तर ॲक्टिव्ह रुग्ण संख्या 1617 वर पोहोचली आहे. आजपर्यंत एकूण 4789 रुग्णांचा मृत्यू झाला.

तरीही नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी. तोंडाला मास्क, हात धुणे आणि शारिरीक आंतरपालन करण्याचे आवाहन पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.