Pune : रोटरी क्लब प्राधिकरणातर्फे ‘कोरोना व्हायरस’बाबत निगडीत जनजागृती

एमपीसी न्यूज – रोटरी क्लब ऑफ प्राधिकरणातर्फे निगडीतील मॉडर्न स्कूल, बिझी बिस शाळा आणि परिसरात ‘कोरोना व्हायरस’बाबत जनजागृती करण्यात आली. तसेच विद्यार्थ्यांनी मॉडर्न स्कूल ते यमुनानगर परिसरात फेरी काढून जनजागृती केली. ‘कोरोना व्हायरस’बाबत घ्यावयाची काळजी, त्याच्यावरील उपाययोजनांबाबत जागृती करण्यात आली.

या जनजागृती रॅलीत रोटरी क्लब ऑफ प्राधिकरणाचे अध्यक्ष बहार शहा, युवा संचालक दीपा जावडेकर, मॉडर्न स्कूलच्या कुलकर्णी मॅडम यांच्यासह स्कूलमधील, बिझी बिस शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

_MPC_DIR_MPU_II

याबाबत बोलताना अध्यक्ष बहार शहा म्हणाले, कोरोना व्हायरसने चीन देशात धुमाकूळ घातला आहे. नागरिकांचा मृत्यू झाला आहे. भारतात देखील हा व्हायरस दाखल होण्याची शक्यता आहे. त्याबाबतची भीती व्यक्त केली जात आहे. पिंपरी-चिंचवड शहरात असंख्य नागरिक बाहेरून दाखल होत असतात. त्यापार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी आणि खबरदारीची उपाययोजना म्हणून जनजागृती करण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.