Pune : जिल्ह्यात कोरोनाचे नवे 404 रुग्ण; एकूण रुग्णसंख्या 6 हजार 303

Corona's new 404 patients in the district; The total number of patients is 6 thousand 303

एमपीसी न्यूज – पुणे जिल्ह्यात आज कोरोनाचे तब्बल 404 नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता 6 हजार 303 इतकी झाली आहे. दरम्यान, पुणे जिल्हयातील 3 हजार 195 कोरोना बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत.

सध्या जिल्ह्यात ॲक्टीव रुग्ण संख्या 2 हजार 819 आहे. कोरोनाबाधित एकूण 289 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 208 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत.

आज कोरोनाचे 404 नवे रुग्ण नव्याने आढळून आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर सर्व व्यवहार ठप्प झाले होते. त्यानंतर अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी पुणे शहरात 90 टक्के भाग खुला करण्यात आला आहे. त्यामुळे शहरात झपाट्याने कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मास्क लावणे, सॅनिटायजरचा वापर करणे, सोशल डिस्टनसिंगचे नियम पाळण्याचे आवाहन प्रशासनातर्फे वारंवार करण्यात येत आहे.

शहरातील कंटेन्मेंट झोन वगळता सर्वच परिसरात आता वर्दळ वाढली आहे. जीवनावश्यक वस्तूंपासून, सोने – चांदी, कापड, मोबाईल, अशी सर्वच दुकाने सुरु करण्यात आली आहेत. मात्र, या दुकानांना ग्राहकांची प्रतीक्षा आहे.

पुण्यातील 90 टक्के भाग खुला झाल्याने शहरात मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. त्यामुळे आणखी कोरोनाचे रुग्ण वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. शहरात 31 मे पर्यंत 5 हजार कोरोनाचे रुग्ण होणार असल्याचे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी सांगितले होते.

मात्र, आताच शहरातील रूग्णसंख्या 5 हजारांच्या पुढे गेली आहे. आणखी कोरोनाचे रुग्ण वाढणार असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.