Pune : कोरोनाचे नवीन 750 रुग्ण; 728 जणांना डिस्चार्ज, 25 मृत्यू

Corona's new 750 patients; Discharge of 728 persons, 25 deaths

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या मंगळवारी तब्बल 5 हजार 749 टेस्ट करण्यात आल्या. त्यामध्ये 750 रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले. 728 जण ठणठणीत बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. 25 जणांचा या विषाणूमुळे मृत्यू झाला.

सध्या 513 क्रिटिकल रुग्ण असून, त्यात 198 जण व्हेंटिलेटरवर आहेत. कोरोनाचे शहरात 29 हजार 107 रुग्ण झाले आहेत. 18 हजार 825 रुग्णांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे.

आजपर्यंत 874 नागरिकांना या रोगामुळे आपल्या प्राणास मुकावे लागले. कोरोनाचे 9 हजार 409 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे देण्यात आली आहे.

कोथरूडमधील 74 वर्षीय महिलेचा, सिंहगड रोडवरील 55 वर्षीय पुरुषाचा, सुखसागर नगरमधील 63 वर्षीय महिलेचा, धनकवडीतील 65 वर्षीय पुरुषाचा दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये कोरोनामुळे मृत्यू झाला.

महाराणा प्रताप हौसिंग सोसायटीतील 65 वर्षीय पुरुषाचा AICTS हॉस्पिटलमध्ये, कात्रजमधील 45 वर्षीय पुरुषाचा सह्याद्री हॉस्पिटलमध्ये, हडपसरमधील 65 वर्षीय महिलेचा ससून हॉस्पिटलमध्ये, कात्रजमधील 44 वर्षीय पुरुषाचा भारती हॉस्पिटलमध्ये, आंबेगाव बुद्रुकमधील 80 वर्षीय पुरुषाचा, कोथरूडमधील 90 वर्षीय पुरुषाचा भारती हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला.

हडपसरमधील 72 वर्षीय महिलेचा, सिंहगड रोडवरील 55 वर्षीय महिलेचा ससून हॉस्पिटलमध्ये, वडगावशेरीमधील 49 वर्षीय महिलेचा केईएम हॉस्पिटलमध्ये, शनिवार पेठेतील 72 वर्षीय पुरुषाचा पुना हॉस्पिटलमध्ये, गोखलेनगरमधील 86 वर्षीय पुरुषाचा AIMS हॉस्पिटलमध्ये, मार्केटयार्डमधील 49 वर्षीय पुरुषाचा ताराचंद हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला.

भवानी पेठेतील 55 वर्षीय पुरुषाचा ताराचंद हॉस्पिटलमध्ये, सिंहगड रोडवरील 85 वर्षीय पुरुषाचा काशीबाई नवले हॉस्पिटलमध्ये, वारजेतील 70 वर्षीय पुरुषाचा पुना हॉस्पिटलमध्ये, कात्रजमधील 53 वर्षीय पुरुषाचा भाकरे हॉस्पिटलमध्ये, धायरीतील 75 वर्षीय महिलेचा ससून हॉस्पिटलमध्ये, नऱ्हेतील 89 वर्षीय पुरुषाचा, कात्रजमधील 67 वर्षीय पुरुषाचा, मार्केटयार्डमधील 54 वर्षीय महिलेचा व मूळशीतील 50 वर्षीय पुरुषाचा दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये कोरोनामुळे मृत्यू झाला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.