Pune : गोरगरिबांसाठी नगरसेवक राजाभाऊ लायगुडे स्वतः बनले आचारी

एमपीसी न्यूज – सध्या कोरोनाच्या संकटामुळे गोरगरिबांसह बेघर नागरिकांचे जेवणाचे हाल सुरु आहेत. काही सेवाभावी संस्था, लोकप्रतिनिधी अशा नागरिकांना मोफत अन्नदान करीत आहेत. मात्र, या संकटकाळात आचाऱ्याची कमतरता जाणवत आहे. त्यामुळे भाजपचे प्रभाग 33 चे नगरसेवक राजाभाऊ लायगुडे स्वतःच आचारी बनले आहेत.

लॉकडाऊनमुळे गोरगरीब नागरिकांचे हाल होऊ नये म्हणून धायरी परिसरात गरजुंना दररोज अडीच हजार जेवणाचे डबे दिले जात आहेत. नगरसेवक राजाभाऊ लायगुडे आणि त्यांच्या मित्र परिवारातर्फे हे अन्नदान नियमितपणे सुरू आहे. त्याचबरोबर गोरगरिबांना गहू, तांदूळ, डाळ, साखर, कांदे – बटाटे, भाजीपाला घरपोच वाटप करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार सामाजिक बांधिलकी जपून हे अन्नदान सुरू असल्याचे राजाभाऊ लायगुडे यांनी सांगितले.

दरम्यान, अन्नदान करण्यासाठी कार्यकर्त्यांची फळी उभी आहे. मात्र, अन्न तयार करण्यासाठी आचारी मिळत नव्हता. अखेर स्वतः लायगुडे यांनीच आचारी व्हायचा निर्णय घेतला आणि तो प्रत्यक्षात आणला. आज ते स्वतः जेवण तयार करीत आहेत.या कामी त्यांना कार्यकर्त्यांची मदत मिळत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.