Pune : नगरसेवकांत असंतोष खदखदतोय; खासदार संजय काकडे यांच्या भूमिकेकडे लक्ष

एमपीसी न्यूज – 2017 च्या पुणे महापालिका निवडणुकीत भाजपचे तब्बल 98 नगरसेवक निवडून आले होते. निकालापूर्वीच एवढे नगरसेवक निवडून येणार असल्याचा अंदाज राज्यसभेचे खासदार संजय काकडे यांनी व्यक्त केला होता. त्यानुसार तेवढे नगरसेवक निवडून आल्याने सर्वच राजकीय पक्षांना धक्का बसला होता. त्यानंतर पराभूत झालेल्या नगरसेवकांनी ‘ईव्हीएम’मुळे विजय झाल्याचे सांगत काकडे यांच्या विरोधात आंदोलन केले होते, असो. मूळ मुद्दा असा आहे की, इतर पक्षांतून भाजपात येऊन निवडून आलेल्या नगरसेवकांची संख्या 30 च्या आसपास आहे.

या नगरसेवकांना मागील 3 वर्षांत पुणे महापालिकेत कोणतेही मनाचे पद मिळाले नाही. त्यामुळे या नागरसेवकांत प्रचंड असंतोष खदखदतोय. राज्यात उदयास आलेली महाशिव आघाडी राजकीय समीकरणे बदलणारी आहेत. शिवाय महापालिका निवडणूकही केवळ 2 वर्षांवर आलेल्या आहेत. या परिस्थितीत संजय काकडे काय भूमिका घेणार, याची उत्सुकता आहे.

काकडे यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पाठोपाठ माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशीही मधूर संबंध आहेत. महापालिकेतील नाराज नगरसेवक अधूनमधून संजय यांची भेट घेत असतात. आपले म्हणणे मांडत असतात, ‘त्यावर नाना थांबा जरा, आपल्यालाही ‘अच्छे दिन’ येणार म्हणूनच समजूत घालत असल्याचे या नगरसेवकांनी सांगितले.

महापालिकेत भाजपची एक हाती सत्ता येण्यात काकडे गटाचा मोठा वाटा आहे. मात्र, या गटाला मागील 3 वर्षांत एक ही मानाचे पद मिळाले नाही, त्यामुळे उद्या होणाऱ्या महापौर निवडणुकीत या गटाच्या नगरसेवकाला संधी मिळणार का? याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.