Pune : पावसाळ्यापूर्वी नालेसफाईची कामे न होण्यामागे भ्रष्टाचार हेच मुख्य कारण : अश्विनी कदम

Corruption is the main reason for non-cleaning Sanitation works before the monsoon: Ashwini Kadam

एमपीसी न्यूज – बुधवारी एका दिवसाच्या वादळी पावसाने नागरिकांमध्ये 25 सप्टेंबरला आंबील आढ्याला आलेल्या पुराच्या भयान आठवणी ताज्या झाल्या. कालच्या एका दिवसाच्या पावसाने पुण्यातील पावसाळापूर्व कामाचा पर्दाफाश केला आहे. पावसाळ्यापूर्वी नालेसफाईची कामे न होण्यामागे भ्रष्टाचार हेच मुख्य कारण असल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या नगरसेविका अश्विनी कदम यांनी केला आहे.

कालच्या वादळी पावसामुळे आंबील ओढ्याच्या कडेला राहणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. पुढचे चार महिने अजून काढायचे आणि या सगळ्याला पुणे महानगरपालिकेचा भ्रष्ट कारभार जबाबदार असल्याचेही कदम म्हणाल्या.

कदम पुढे म्हणाल्या, मी सातत्याने सभागृहात आवाज उठवून, प्रशासनाकडे लेखी मागण्या केल्या. आंबील ओढ्यातील सीमा भिंत बांधा, प्राईम मूव्ह प्रमाणे 22 मीटर नाला रुंद करा, आवश्यक पूल, पुतळे, स्ट्रक्चर काढा, अशा अनेक मागण्या केल्या आहेत.

मात्र, पुणे महानगरपालिकेने सगळी कामे अपूर्ण ठेवली आहेत. म्हणूनच आंबील ओढ्याच्या कडेला राहत असलेल्या नागरिकांवर धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. निविदा प्रक्रियांमध्ये होत असलेला भ्रष्टाचार याला जबाबदार आहे.

मग तो कलव्हर्ट बांधायचा, राडारोडा, गाळ काढण्याचा, सीमा भिंत बांधण्याचा, या सगळ्या निविदा प्रक्रियांमध्ये भ्रष्टाचार होत राहिला. त्यामुळे निविदा प्रक्रिया लांबत गेली.

पर्यायाने नाल्यातील कामे सुद्धा लांबत गेली. आज सात – आठ महिन्याने झाले. आता पावसाळ्याच्या तोंडावर नाल्यातील कोणतेही काम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे आंबील ओढ्याच्या कडेने राहणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

महापालिका आयुक्त नवीन असल्यामुळे त्यांना याची काहीच कल्पना नाही. परंतु, आयुक्तांनी सुद्धा ही सर्व कामे अपूर्ण का राहिली, याची चौकशी करावी. जे कोण याला जबाबदार असतील त्यांच्यावर कठोरातील कठोर कारवाई करावी, अशीही मागणी कदम यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.